डोंगरगाव ता.चांदवड जि.नाशिक
dongargaonchd@gamil.com
डोंगरगाव ता.चांदवड जि.नाशिक
dongargaonchd@gamil.com
सुचना :
डोंगरगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक प्रगतीशील गाव आहे.२०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १५४१ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ अंगणवाडी केंद्र २ सामुदायिक सभामंडप २,समाज मंदिर १ पाणीसाठवण सार्वजनिक विहीरी इ.सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावात पिरसाई बाबा देवस्थान हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे.गावात श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर,खंडेराव मंदिर ,आनंदाई मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर द्राक्ष ,कांदा,मका,बाजरी,व गहू हि प्रमुख पिके घेतली जातात मकाव कांदा द्राक्ष या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते.
डोंगरगाव ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत शेकडोकुटुंबांना घराचा लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डोंगरगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे.गावाच्या हद्दीत लहान छोटे मोठे धरणव पाझर तलाव आहेत आहे
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ७ सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वागीण विकास घडवून आणतात.ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
🌾ग्रामपंचायत क्षेत्रफळ(चौ.किमी. मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातीलचांदवड तालुक्यात डोंगरगाव हे गाव आहे.हे गाव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून ८० किमी अंतरावर आहे.चांदवड पासून १२.किमी अंतरावर आहे. . राज्याची राजधानी मुंबईपासून २४८ किमी.आहे.डोंगरगाव गावाला पोस्ट ऑफिसला जोडनेत आलेले आहे.आणि पोस्ट मुख्य कार्यालय चांदवड येथे आहे.
दुगाव ३ (km) सुतारखेडे ३ (km) उसवाड ४ (km) राहूड ५ (km)कोकणखेडे ५ जवळची गावे आहेत.चांदवड मनमाड हि शहरे डोंगरगाव पासून जवळ आहेत.
डोंगरगाव हे गाव साधे,कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवन शैलीसाठी ओळखले जाते.शेती हा गावकरींचा मुख्य व्यवसाय शेती असून, द्राक्ष कांदा.मका,बाजरी आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
गावात सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात.वर्षभर साजरे होणारे सन उत्सव ग्राम दैवतांची पूजाअर्चा तसेच श्रीराम नवमी उत्सव हा गावाच्या एकात्मतेचे प्रतिक मानले जाते.येथे आदिवासी परंपरा आणि संस्कृती चे जतन केले जाते.होळी,गणेशोत्सव,दिवाळी,नवरात्र यासह स्थानिक देवतांचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
येथील लोक ‘अतिथी देवो भाव, ह्या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. येथील लोक मेहनती लोक आहेत. तरून पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगती कडे वाटचाल करत आहे. डोंगरगाव लोकजीवनात धार्मिक संस्कृती व पारंपारिक ग्रामीण जीवनमान आढळून यते. डोंगरगाव गावाची विकासाकडे वाटचालीचे कार्य उत्तम असे सुरु आहे.
ग्रामदैवताचे मंदिर:-डोंगरगाव गावात श्रीराम नवमी च्या दिवशी संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने पूजा करतात.व कालावधीत ७ दिवस सप्ताहाचे आयोजन केले जाते.
डोंगरगाव गावात हनुमानाचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. हनुमान मंदिर वस्तीची शोभा वाढवतात.व येथे धार्मिक कार्यक्रम होत असतात.
डोंगरगाव येथे खंडेराव मंदिर आहे व येथे ७ दिवस मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.
डोंगरगाव पासूनच जवळच चंद्रेश्वर ,शनी मंदिर हे प्रेक्षणीय स्थळे जवळच आहे
कसे पोहचावे:-
डोंगरगाव या ठिकाणी येणेसाठीचांदवड व मनमाड येथून बस ने ये-जा करतात.
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री. नवनाथ प्रकाश शिंदे
श्रीमती. अलका ज्ञानेश्वर शिंदे
श्रीमती.योगिता सचिन पवार
श्रीमती.लताबाई श्रीराम शिंदे
श्री.नाना कारभारी आहेर
श्रीमती.रुपाली अमोल आहिरे
श्री.धर्मा पुंजाराम बर्डे
श्रीमती.कुसुम आण्णासाहेब शिंदे
श्री.बाबाजी भाऊसाहेब शिंदे
सौ.सुनिता रावसाहेब कासव
श्रीमती.योगिता सचिन पवार (ग्रामपंचायत अधिकारी)
श्री.जयस्वाल सर (ग्राम महसूल अधिकारी)
श्री.अशोक निवृत्ती शिंदे (मा.पोलीस पाटील)
श्री.प्रवीण निरभवणे (कृषि सहाय्यक)
श्रीमती.योगिता सचिन पवार (बी.एल.ओ.)
श्री.खापरे सर (मुख्याध्यापक )
श्रीमती .जयश्री संजय कापडणीस (अंगणवाडी कार्यकर्ती .)
श्रीमती.मीनाक्षी दादा पवार (अंगणवाडी कार्यकर्ती .)
श्रीमती.अनिता केशव शिंदे (आशा सेविका )